सार्वत्रिक कामगार संप
भविष्य आपलेच आहे!
पुन्हा एकदा भारतातील कष्टकरी वर्गाने, सार्वत्रिक संपाच्या माध्यमातून देशी-विदेशी भांडवलदारांच्या हितासाठी राबविल्या जाणार्या तथाकथित ’सुधारणांच्या’ विरोधात आपला एल्गार पुकारला आहे. भांडवलशाहीच्या आजवरच्या इतिहासात आणि आजही जगभर कामगार सार्वत्रिक संपांच्या माध्यातून या भांडवली व्यवस्थेविरुद्धचा आपला असंतोष व्यक्त करतात. सुरुवातीला हे संप कामगारांच्या आर्थिक मागण्यांशी संबंधित असले तरी ते एक प्रकारे ही अर्थव्यवस्था कामगारांच्या कष्टावरच चालते व ते ती थांबवूही शकतात या त्यांच्या ताकदीची जाणीवही करुन देतात. ते वर्ग संघर्षाचे गतिशील आयाम दाखवितात जे मुलभूत परिवर्तनासाठीच्या सातत्यपुर्ण संघर्षांच्या संचित प्रक्रियेतून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाची क्रांती घडवू शकतात.